कोळसा खाण घोटाळाप्रकरणी 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

September 22, 2012 11:59 AM0 commentsViews: 98

22 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज देशभरात सात ठिकाणी छापे टाकले. त्यात नागपूर, चंद्रपूर, आसनसोल आणि पुरुलियाचा समावेश आहे. विकास इंडस्ट्रीज आणि ग्रेस इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांविरोधात सीबीआयने नव्याने गुन्हे दाखल केले आहे. कोळसा खाणी मिळवण्यासाठी या दोन कंपन्यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, काही अधिकारी यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

close