एफडीआय,दरवाढीबाबत पंतप्रधान देशापुढे मांडणार भूमिका

September 21, 2012 10:28 AM0 commentsViews: 4

21 सप्टेंबर

तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर आज संध्याकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. डिझेल दरवाढ आणि एलपीजीच्या सबसिडीवरची मर्यादा कशी गरजेची आहे हे पंतप्रधान स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एफडीआयच्या निर्णयाचंही ते समर्थन करतील. एफडीआयमुळे कल्याणकारी योजनांसाठी जादा निधी मिळेल आणि रोजगारनिर्मिती होईल. इतर काही क्षेत्रांतही एफडीआयची आवशक्यताही पंतप्रधान व्यक्त करण्याची शक्यता आहे. विमाक्षेत्रात एफडीआयची मर्यादा वाढवण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे.

थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून जी परिस्थिती निर्माण झालीय, अशा वेळी सरकारची पुढची रणनीती काय असेल, पाहूया

- आर्थिक सुधारणांच्या मुद्द्यावर सर्व घटक पक्षांना एकत्र करणं- सपाचे 22 खासदार सरकारसाठी तारणहार ठरणार आहेत, त्यामुळे मुलायम सिंह यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणं- मायावतींची भूमिका महत्त्वाची. 21 खासदार असलेल्या मायावतींनी सरकारचा पाठिंबा काढला तर मुलायम सिंहसुद्धा मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयारी करतील- पण मायावतींना मुदतपूर्व निवडणूक नकोय. उत्तर प्रदेशात सरकारविरोधी जनभावना तयार होण्याची त्या वाट बघतील.- झारखंड मुक्ती मोर्चा, धर्मनिरपेक्ष जनता दल, बाबुलाल मरांडी यांच्यासारख्या छोट्या आणि कुंपणावर असलेल्या पक्षांशी यूपीएची चर्चा- बिजू जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याची यूपीएला एफडीआयचा विरोध थोडा मवाळ करण्यात मदत होईल- थेट परकीय गुंतवणुकीवर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज उरणार नाही- शेवटचा पर्याय म्हणून विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जातील- तातडीचा उपाय म्हणून लोकप्रिय आश्वासनांचा वर्षाव

close