धोणी बिग्रेड सुसाट !

September 24, 2012 3:14 PM0 commentsViews: 77

24 सप्टेंबर

टीम इंडियानं इंग्लंडचा धुव्वा उडवत इतर टीम्सना इशारा तर दिलाय. पण या विजयाचा टीम इंडियाच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. सुपर एटमधील टीमची जागा याआधीच पक्की झाली आहे. पण तरीही सुपर एटमध्ये आत्मविश्वास उंचावलेली टीम इंडिया खेळणार आहे. आणि हीच भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची गोष्ट आहे.

सुपर एटमध्ये टीम इंडियात जागा पटकाण्यासाठी या दोन स्पिनर्समध्ये काल मुकाबला होता. आणि दोघांनीही काल कमालीची बॉलिंग केली. दोघांनी मिळून तब्बल 6 विकेट घेतल्या. पियुषनं त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये 2 विकेट घेतल्या तर हरभजननं तब्बल एका वर्षानंतर टीममध्ये कमबॅक करत 4 विकेट पटकावल्या. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा खिताबही मिळवला.

पण या मॅचनंतर धोणीसमोर आता यक्षप्रश्न उभा राहिला. सुपर एटमध्ये अश्विनबरोबर हरभजनला खेळवायचं की लेग ब्रेकचा ऑप्शन देणार्‍या पियुषला संधी द्यायची, की पाच बॉलर्स खेळवत या तिघांनीही अंतिम अकरात खेळवायचं.

पण धोणीसमोरच्या समस्या या इतक्यात संपणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये विश्रांती दिलेल्या विरेंद्र सेहवागला परत टीममध्ये कसं आणायचं ? गंभीर आणि रोहीत शर्मा फॉर्ममध्ये परतले आहे. युवराज बॅटिंगबरोबर बॉलिंगही करतोय. कोहली आणि रैनाची जागा पक्की आहे. त्यामुळे कॅप्टन धोणी माठी रिस्क घेऊन सर्वात धडाकेबाज बॅट्समनला वगळणार का ? हाच प्रश्न आहे.

टीम इंडियाची पुढची मॅच ही शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे सुपर एटमध्ये नेमकी कोणती टीम खेळवायची याचा निर्णय घेण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडे पुरेसा वेळ आहे. पण हा एक चांगला प्रश्न आहे कारण टीम अखेर फॉर्मात आली आहे.

close