श्वेतपत्रिका काढण्यासाठी राष्ट्रवादी तयार

September 25, 2012 9:36 AM0 commentsViews: 31

25 सप्टेंबर

अखेर सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढू, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली. तर येत्या हिवाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका काढू असं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी कुठल्याच खात्याच्या श्वेतपत्रिकेची मागणी राष्ट्रवादीनं केलेली नाही असं वक्तव्य केलं होतं. पण आता मात्र विदर्भ सिंचन घोटाऴ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आल्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा सिंचन श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावर आपली भुमिका बदली. त्यावरून सिंचन श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं उघड झालंय. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागिल आठवड्यात जलसिंचन प्रकल्पाच्या चौकशीला हिरवा कंदील दिला आहे.

close