प्रफुल्ल पटेल अडचणीत, सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

September 21, 2012 11:57 AM0 commentsViews: 13

21 सप्टेंबर

सुप्रीम कोर्टाने एअर इंडिया आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाणमंत्री असतांना बोईंग विमानाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. बोईंग विमानांचा दुरुपयोग करण्याची चौकशी करण्यात यावी यासाठी ऍड. प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. उत्पन्न मिळणार्‍या मार्गावर बोईंग विमान एअर इंडियासाठी न वापरता खाजगी एअरलाईन्सना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गैरव्यवहारामुळे एअर इंडियाला 100 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केला आहे. याचिकेत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच मागणी केली होती.

close