काँग्रेसचं ममतांना जशास तसे उत्तर,’तृणमूल’चा पाठिंबा काढणार

September 21, 2012 12:06 PM0 commentsViews: 7

21 सप्टेंबर

दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयावरुन तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. काँग्रेसनंही याला जशास तसं उत्तर दिलंय. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा काढून घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. पण आता काँग्रेसचे राज्यातले सर्व मंत्री उद्या ममता बॅनर्जी यांना भेटून आपले राजीनामे देणार आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये ममतांना पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसनं पाठिंबा काढला तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही.