गुंतवणुकीवर फारसा परिणाम नाही – पी. चिदंबरम

November 30, 2008 5:49 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर दिल्लीमुंबईतील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतातल्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होणार नाही, असं अर्थमंत्री पी. चिदंम्बरम यांनी स्पष्ट केलंय. फार थोड्या वेळासाठी गुंतवणूक कमी होईल. पण थोडया काळानंतर मात्र गुंतवणुकीचा ओघ व्यवस्थित होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काही दिवसांत परिस्थिती नक्कीच आटोक्यात येईल. ज्या लोकांनी भारतात गुंतवणूक केली आहे, त्यांच्या गुंतवणूकीला कोणताही धोका नाही. जागतिक स्तरावरच्या सर्व गुंतवणूकदारांना भारत सरकार सर्वतोपरी मदत करेल. मुंबईत जे काही घडलं, त्याचा देशातल्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. असा विश्वास त्यांनी गुतंवणूकदारांना दिला.

close