पुणे इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 11 वर

September 25, 2012 11:08 AM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर

पुण्यात सहकारनगरमध्ये तळजाई पठारावर काल 4 मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर पोहचली आहे. तर 12 जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये 1 महिला, 2 लहान मुलं, 7 पुरुष आहेत. जखमींवर भारती हॉस्पिटल आणि ससूण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन लहान मुलींना ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. पण ही इमारत अनधिकृत होती. इमारतीचे मालक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदेंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना रात्री उशीरा अटक केली. तर या जागेचा मालक लहू सावंत फरार आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close