अजित पवारांचा राजीनामा

September 25, 2012 11:38 AM0 commentsViews: 13

25 सप्टेंबर

जलसिंचन प्रकल्पावरुन माझ्यावर होत असलेल्या आरोपातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचा आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा देत असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजितदादांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. मी माझा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कानावर घातला आहे. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्यावरील आरोप जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मी उपमुख्यमंत्रीपद सोडत आहे असं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. याकाळात आपण आमदार म्हणून वावरणा असल्याचंही अजितदादांनी सांगितलं. अजित पवार यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. अजितदादांच्या अचानक केलेल्या घोषणेमुळे आघाडीला एकच हादरा बसला आहे. तर राज्याच्या राजकारणालाही वळण दिलं आहे.

अजित पवारांची घोषणा

'जलसिंचन प्रकल्पावर किती तरतूद झाली, भूसंपादसाठी किती खर्च झाला, श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. महिनोंमहिने फाईली मंत्रालयात ठेवणं मला योग्य वाटत नाही. आलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेणं ही माझ्या कामाची पध्दत आहे. यावर टीका होणं याच्याशी मी सहमत नाही. या प्रकरणाची पूर्ण पाहणी, विलंबाची आणि अधिक खर्चाची मिमांसा करता यावी म्हणून मी उमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठींकडे कळवले आहे आणि माझ्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी सहमती दर्शवली आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवलेला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी,शासकीय अधिकार्‍यांनी मला उत्तम सहकार्य दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच राज्यातील जनतेसाठी राष्ट्रवादीचा आणि माझा अहोरात्र प्रयत्न राहील हा विश्वास सर्वांना देतो व यासाठी जनतेची साथ मिळेल असा विश्वास बाळगतो.' अजित पवार

अजित पवारांवर आरोप

close