निकृष्ट बांधकामामुळे धरणं धोक्यात – पांढरे

September 24, 2012 9:53 AM0 commentsViews: 8

24 सप्टेंबर

तारळी, लोअर तापी, गोसीखुर्द यासारख्या राज्यातल्या बहुतांश धरणांचं बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार पाटबंधारे विभागाचे तांत्रिक सल्लागार समिती सदस्य विजय पांढरे यांनी केली. त्यांनी केलेल्या तपासणीत तारळी धरणाच्या बांधकामात 82 लाख सिमेंटऐवजी फक्त 42 टक्के म्हणजे 32 लाख सिमेंटच्या बॅग वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, त्यांचे अहवाल दडपून चौकशीचा फार्स केल्याची त्यांची तक्रार आहे. ठेकेदार आणि पुढार्‍यांच्या संगनमताने निकृष्ठ बांधकामापायी लोकांच्या जीविताशी खेळ होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

close