अजितदादांचा निर्णय योग्यच -शरद पवार

September 25, 2012 12:55 PM0 commentsViews: 5

25 सप्टेंबर

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी त्यांच्या पाठिशी आहे. त्यांनी श्वेतपत्रिका काढण्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते योग्य आहे असं सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादांना पाठीशी घातलं आहे. तसेच आम्ही आघाडी सोबतच राहणार आहोत. आम्हाला सरकार अस्थिर करायचं नाही असं स्पष्ट करत शरद पवारांनी राष्ट्रवादींच्या आमदार,खासदारांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी काहीही निर्णय घेऊ नये निर्णय घेण्यासाठी पक्षश्रेष्ठी समर्थ आहे असंही पवारांनी ठणकावून सांगितलं. शरद पवार यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. यावेळी ते बोलत होते.

close