इस्त्रायलमधून एक्सपर्टसची टीम भारतात येणार

November 30, 2008 4:19 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर मुंबईमुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नऊ इस्त्रायली नागरिक ठार झाले आहेत. हे सर्व लोक नरिमन हाऊसमध्ये होते. या मृत्यूमुखी पडलेल्या इस्त्रायली नागरिकांच्या पोस्टमार्टमसाठी खास इस्त्राइलमधून एक्सपर्टसची टीम भारतात आणण्यात येणार आहे. भारत सरकारने इस्त्रायलला तशी परवानगी दिली आहे. याशिवाय मृतदेह ओळखण्यासाठी विशेष प्रकारच्या मेडिकल टेस्ट करणा-या मशिन्सही इस्त्रायलमधून भारतात आणल्या जाणार आहेत.अशी माहिती इस्त्रासलचे राजदूत मार्क सोफर यांनी दिली.

close