राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

September 25, 2012 2:51 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केले आहे. अजितदादांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासह अन्य खासदार,आमदारांची बैठक झाली. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या विधीमंडळाची बैठक होणार आहे या बैठक पुढची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असं स्पष्ट केलं होतं. मात्र पवारांच्या आवाहनाला डावलून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाऊल उचलले आहे. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर काँग्रेसची तातडीची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे उपस्थित होते. अजितदादांचं राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना मिळालंय. पण याबाबतचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करुन घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातल्या विधानसभेचं सध्याच चित्र

- एकूण सदस्य संख्या : 288- बहुमताचा आकडा : 145- बहुमताचा आकडा : 145- काँग्रेस 82 + राष्ट्रवादी काँग्रेस 62 + अपक्ष 27 = 171- काँग्रेस 82 + अपक्ष 27 – राष्ट्रवादी काँग्रेस 62 = 109- बहुमतापेक्षा 36 सदस्य कमी

संबंधित बातम्या (कृपया हेडलाईनवर क्लिक करा)

अजित पवारांचा राजीनामा अजितदादांचा निर्णय योग्यच -शरद पवार अजित पवारांवरील आरोपराज्यातलं सरकार अस्थिर करणार नाही -पवार आम्ही काँग्रेससोबतच राहणार -पटेल अजित पवारांची ही नौटंकी – उध्दव ठाकरे अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार

close