घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा वितरकांचा इशारा

September 24, 2012 10:22 AM0 commentsViews: 4

24 सप्टेंबर

केंद्र सरकारने सिलेंडरवर घातलेल्या मर्यादामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. वर्षाला सहा सिलेंडर सबसिडी दरात मिळतील आणि सातवा सिलेंडर घेतला तर बाजारमुल्यानूसार किंमत मोजावी लागले असा निर्णय सरकारने जारी केली. मात्र सातव्या सिलेंडरवर किंमत किती मोजायची ? या प्रश्नावरुन घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रीब्युटर्सने दिला आहे. सवलतीच्या दरानंतर दिला जाणारा सातवा सिलेंडर नक्की कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा याबाबबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत. जर 1 ऑक्टोबरपर्यंत सरकारने याबाबत सूचना दिल्या नाहीत तर घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रिब्युटर्सने दिला आहे.

close