BCCIच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील

September 27, 2012 3:13 PM0 commentsViews: 11

27 सप्टेंबर

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कोच संदीप पाटील यांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. क्रिस श्रीकांत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संदीप पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही निवड होईपर्यंत संदीप पाटील यांचं नावही चर्चेत नव्हतं. त्यामुळे सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का मानला जातोय. पश्चिम विभागातून त्यांची निवड झाली आहे. पश्चिम विभागातून अंडर 19 टीमचे सिलेक्टर ऍबी कुरुविल्ला यांचं नाव आघाडीवर होतं. पण त्यांना पसंती दिली गेली नाही. संदीप पाटील याअगोदर बंगळूरुत असलेल्या भारताच्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीचे अध्यक्ष होते. यानंतर ते आता निवड समिती अध्यक्षपद भूषवतील. आणखी एक धक्का म्हणजे श्रीकांत यांच्या निवड समितीत असलेले सदस्य मोहिंदर अमरनाथ यांना तर निवड समितीतून डच्चू दिला गेला आहे. श्रीकांतनंतर अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना आता निवड समिती सदस्य म्हणून काम करावं लागेल. दक्षिण विभागातून त्यांची नियुक्ती केली गेली आहे. तर पूर्व विभागातून भारताचा माजी विकेटकिपर साबा करीम, उत्तर विभागातून विक्रम राठोड तर मध्य विभागातून पाजिंदर सिंह हंस यांची वर्णी निवड समितीवर लागली आह.

close