पुण्यात इमारत कोसळली, 6 ठार

September 24, 2012 10:35 AM0 commentsViews:

24 सप्टेंबर

पुण्यात सहकारनगरमध्ये तळजाई पठारावर 4 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले आहे. यात 5 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर तिन जण जखमी झाले आहे. पण ढिगार्‍याखाली आणखी पाच जण अडकल्याची भीती आहे. या पाच जणांमध्ये तीन बहिणी आहेत. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. पण ही इमारत अनधिकृत होती आणि तिच्या मालकावर गुन्हा नोंदवण्यात येईल अशी माहिती आयुक्त महेश पाठक यांनी दिली. फायर ब्रिगेडचे मदतकार्य सुरु आहे. या इमारतीत एकच भाडेकरु कुटुंब राहात होतं. इतर फ्लॅट्समधे काम सुरु होतं. त्यामुळे मजूर अडकले असल्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक संजय नांदे या इमारतीचे मालक आहेत. नांदे आणि लहु सावंत यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवणार असं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

close