पिंपरीमध्ये पुन्हा वाहनांची जाळपोळ

September 24, 2012 11:46 AM0 commentsViews: 2

24 सप्टेंबर

पिंपरीमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळीचा प्रकार घडला आहे. पिंपरी गावात धर्मा अपार्टमेंट सोसायटीत 4 दुचाकी वाहनं जाळण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पिंपरीच्या आंबेडकर चौकामध्ये वाहन जाळली गेली होती. ज्या ठिकाणी आजची घटना घडली त्याठिकाणी पोलिसांची गस्त नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे त्यामुळेच वाहनांचे पार्ट चोरीला जाणं पेट्रोल चारीला जाणं आणि अशा घटना वारंवार होत असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

close