अजितदादा उपमुख्यमंत्री नसतील तर फेरविचार करु -अपक्ष

September 26, 2012 8:45 AM0 commentsViews: 3

26 सप्टेंबर

सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता अपक्षही सरसावल्याचं दिसतंय. 12 अपक्ष आमदार सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करु शकतात. असा इशारा या अपक्ष आमदारांचे नेते दिलीप सोपल यांनी दिला. सरकारच्या स्थापनेच्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री होणार म्हणून या 12 आमदारांनी पाठिंबा दिला होता. पण आता अजित पवार जर का उपमुख्यमंत्री राहणार नसतील तर आंम्ही वेगळा विचार करु अशी माहिती.आ.दिलीप सोपल यांनी दिली.

close