आर.आर.पाटील यांचा राजीनामा

December 1, 2008 4:58 AM0 commentsViews: 10

1 डिसेंबर, मुंबई मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांचं नाव गृहमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. दरम्यान, आर.आर. पाटील राजीनामा दिल्यानंतर सांगलीला रवाना झाले आहेत. आबांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की आर. आर. पाटील यांनी आज सकाळी मला फोन करुन राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे मी विलासरावांना फोन करुन आर. आर. पाटील यांचा राजीनामा स्वीकारण्यास सांगितलं.

close