यूपीएच्या बैठकीत घटक पक्षांचे नाराजीचे सूर

September 27, 2012 4:34 PM0 commentsViews: 4

27 सप्टेंबर

ममता बॅनर्जी यांनी यूपीएला रामराम केल्यानंतर आज पहिल्यांदा यूपीएच्या समन्वय समितीची बैठक झाली. पण या बैठकीत यूपीएच्या घटकपक्षांमध्ये असलेले मतभेदच उघड झाले. घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर सरकारनं जी मर्यादा घातलीय ती वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी केली. तर डिझेल दरवाढही मागे घेण्याची मागणी द्रमुकनं केली आहे. या दरवाढीमुळे निवडणूक जिंकणं अवघड होईल अशी भीती या मित्रपक्षांनी व्यक्त केली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि अर्थमंत्री मात्र निर्णयांवर ठाम आहेत.

close