बुलडाण्यात एसटी बस नदीत कोसळून 19 ठार

September 26, 2012 1:11 PM0 commentsViews: 8

26 सप्टेंबर

बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एसटी बस नदीत कोसळल्यानं 19 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. संग्रामपूर-शेगाव ही बस पूर्णा नदीच्या पात्रात 60 फूट उंचीवरुन कोसळली. ही बस शेगावरुन पाथुर्डे येथे जात असताना खिरोडा येथील पुलावर हा अपघात घडला. या अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर कंडक्टरला वाचवण्यात यश आलंय. या बसमध्ये जवळपास 36 प्रवासी होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात एका दीड वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलंय. दरम्यान, या पुलाला कठडे नसल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी इथल्या गावकर्‍यांनी केली आहे.

close