राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे – मुख्यमंत्री

December 1, 2008 5:49 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर, मुंबई पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला आहे. माझ्या राजीनाम्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय अर्थमंत्री शिवराज पाटील आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्यानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचे राजकीय बळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ठरणार असल्याची चिन्हं दिसायला लागली आहेत. काँग्रेस हायकमांड विलासराव देशमुख यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला आहे. त्यांच्याजागी मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेते ए. के.अँटोनी, अहमद पटेल आणि पी. चिदंबरम यांची सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथला बैठक झाली. विलासराव देशमुखांचा राजीनामा सोनियांकडे पोहचल्याचं अँटोनी यांनी बैठकीनंतर सांगितलं. आता त्याबाबतचा निर्णय मित्रपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, असंही ते म्हणाले. मुंबईवर दहशवादी हल्ला होणार, याची पूर्वसूचना मिळूनही तो रोखण्यात अपयश आल्यानं मुख्यमंत्री टीकेचा विषय बनले होते. त्यातच मुलगा रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन दहशतवादी हल्ल्याला बळी पडलेल्या ताजमहाल हॉटेलची सफर केल्यानं त्यांच्यावरील टीकेत भरच पडली. पण आता मात्र विलासरावांना खुर्ची सोडणं अटळ आहे, असं दिसतंय. शिवराज पाटील आणि आर. आर.पाटील यांच्यानंतर मुंबई हल्ल्याचे राजकीय बळी विलासरावच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. त्यांच्याजागी पृथ्वीराज चव्हाण यांचा ' वर्षा 'मध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

close