राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

September 28, 2012 10:21 AM0 commentsViews: 4

28 सप्टेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांविरोधात केलेली विधानं आणि 2008 साली परप्रांतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने दणका दिला आहे. राज यांच्या विरोधात सब्जीमंडी पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

बिहारी लोकांना घुसखोर समजून राज्यातून हाकलून लावू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यामुळे संतप्त झाले बिहारी नेत्यांनी एकच कल्लोळ केला होता. राज यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत बिहार येथील दोन कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे प्रकरण दिल्लीतील तीस हजारी कोर्टात यावर सुनावणी सुरु झाली. आज कोर्टाने 2008 साली जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी करण्यात आला. 2008 साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीय विद्यार्थी मुंबईकडे रवाना झाले होते. यावेळी राज यांच्या इशार्‍यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय विद्यार्थ्यांना कल्याण,ठाणे स्थानकावर बेदम मारहाण केली होती. यासोबतच मागिल महिन्यात बिहारी लोकांविरोधात केलेल्या विधानामुळेही राज यांच्यावर आरोप आहे. तीस हजारी कोर्टात राज यांच्याविरोधात आणखी 7 वेगळे खटले दाखल आहे. बिहारमध्ये अजामीनपत्र जारी झाल्यानंतर राज यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खटले दिल्लीतील कोर्टात सुरु करण्यात आले. राज यांच्या वकिलांनी गणेशोत्सव सुरु असल्यामुळे सुनावणी दरम्यान हजर राहु शकत नाही असं सांगितलं. त्यामुळे कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. याची पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे.

close