पुण्यात गणेश विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

September 28, 2012 3:51 PM0 commentsViews: 9

28 सप्टेंबर

पुण्यातह गणपती विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यातच पुण्यात बॉम्बस्फोट झाल्यानं पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले आहे. यंदा गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि कॉलेजचे विद्यार्थीही विसर्जन मार्गावर पोलिसांना मदत करणार आहेत. मिरवणूक नीट पार पडावी तसेच मंडळं एका ठिकाणी जास्त वेळ रेंगाळू नये यासाठी मंडळांच्या प्रतिनिधींना टेहळणी पथकं स्थापन करायला पोलिसांतर्फे सांगण्यात आलं आहे. काही गैरप्रकार झाला तर लोकांना सुचना देण्यासाठी पब्लिक ऑड्रेस सिस्टिम देखील बसवण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखिल लावण्यात आले आहेत. या बरोबरीने प्रत्येक चौकामध्ये व्हिडिओ शुटिंग देखिल केलं जाणार आहे.

close