डॉल्बीचा दणदणाट करण्यार्‍या मंडळांवर होणार पोलिसांची कारवाई

October 1, 2012 2:12 PM0 commentsViews: 6

01 ऑक्टोबर

कोल्हापुरमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांच्या डॉल्बी न लावण्याच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीत अनेक मंडळांनी बिनदिक्कतपणे पोलिसांसमोरच डॉल्बीचा दणदणाट करुन नियमभंग केला त्यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी शहरातल्या 33 मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आणि रात्री 12 नंतर स्पीकर लावल्याचा गुन्हा या मंडळांवर दाखल करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी ध्वनीयंत्रणेवरुन आवाजाची तीव्रता मोजली त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त आवाज म्हणजेच आवाजाची तीव्रता ही 110 डेसिब्ल्सपेक्षा जास्त होती. त्यामुळे मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या मंडळांमध्ये कोल्हापूर शहरातली 13 तर इचलकरंजी शहरातली 20 मंडळं आहेत.

close