तिसर्‍या टप्प्यात जम्मू-काश्मिरमध्ये भरघोस मतदान

December 1, 2008 6:36 AM0 commentsViews:

1 डिसेंबर, जम्मू-काश्मिरजम्मू आणि काश्मीरमध्ये तिसर्‍या टप्प्यातही भरघोस मतदान झालं. पहिल्या दोन टप्प्यातल्या मतदानाची सरासरी तिसर्‍या टप्प्यातही कायम राहिली. फुटीरवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या कुपवाडामध्ये 62 टक्के मतदान झालं. फुटीरवाद्यांनी टाकलेल्या बहिष्काराची पर्वा न करता लोकांनी मतदान केलं. तिसर्‍या टप्प्यात कुपवाडा, कर्नाह, लांगेट, हंदवाडा आणि लोला या पाच मतदारसंघात मतदान झालं. कर्नाहमध्ये उच्चांकी 78 टक्के मतदान झालं. दरम्यान, दोन ठिकाणी फुटीरवाद्यांनी मतदानाविरोधात निदर्शनं केली. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात 8 जण जखमी झाले.

close