परतीच्या पावसाचा तडाखा, 3 ठार

October 1, 2012 3:18 PM0 commentsViews: 6

01 ऑक्टोबर

मुंबईसह उपनगरातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन संध्याकाळी पावसाने वीजांच्या कडकाडाटसह मुंबई,ठाणे,कल्याण आणि उपनगरांना झोडपून काढले. भिंवडीत वीज पडून तीन जण ठार झाले आहे. अर्धातास पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली. जून महिन्यात पावासाचे आगमन झाल्यानंतर अधूनमधुन हजेरी लावल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला होता. मराठवाड्यात दोन महिने पावसाने दडी मारली होती. पण अखेरीस शेवट गोड केला. मुंबईसह राज्यभरात पाऊस धो-धो बरसला त्यामुळे राज्यावरचे पाणी टंचाईचे 'विघ्न' टळले. गारमय झालेलं वातावरण सरले आणि मुंबईकरांचे 'हिट' दिवस पुन्हा सुरु झाले. सप्टेंबर महिन्याच्या शेवट उकाड्यामुळे मुंबईकर पुरते हैराण झाले. ऑक्टोबर हिटला आज सुरुवात होत नाही तोच संध्याकाळी पावसाने धूमशान घातले. मुंबईसह, ठाणे,कल्याणाला अक्षरश: झोडपून काढले. ऐन संध्याकाळी सुरु झालेल्या पावसामुळे चाकरमान्यानी चिंब भिजतच घरं गाठले. गेल्या तीन चार दिवसांपासून उकाड्यापासून तरी आज मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

close