विजय पांढरेंचा राष्ट्रवादीला अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा

September 27, 2012 12:23 PM0 commentsViews: 58

27 सप्टेंबर

जलसिंचन खात्यातील घोटाळा उघड करणार्‍या विजय पांढरे यांनी राष्ट्रवादीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर असताना पांढरे यांनी 2001 मध्ये तापी महामंडळाच्या निकृष्ट बांधकामाचा अहवाल दिला होता. त्याबद्दल सरकारने महामंडळाकडे स्पष्टीकरण मागितलेलं. ते देण्याऐवजी महामंडळाने पांढरे मनोरुग्ण असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं.तापी खोरे महामंडळाच्या गैरव्यवहाराचा अहवाल दिला म्हणून आपल्यावर मनोरुग्ण असल्याचा ठपका ठेवल्याचं स्पष्टीकरण विजय पांढरे यांनी दिलंय. राष्ट्रवादीच्या या बदनामीच्या मोहिमेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

close