केजरीवाल यांच्यामुळेच टीम फुटली -अण्णा हजारे

September 28, 2012 4:56 PM0 commentsViews: 6

28 सप्टेंबर

अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच टीम फुटली असून माझी इच्छा नसताना केजरीवाल पार्टी काढत आहे. निवडणुका आल्यावर 'हे' माझ्या नावाचा दुरुपयोग करतील. आंदोलनाचा प्रचारात गैरवापर केला तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका अशी तिखट टीका अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर आपल्या नव्या ब्लॉगमधून केली आहे. अण्णांनी आपल्या नव्या ब्लॉगमध्ये म्हणतात, 'सरकारनं प्रयत्न करूनही टीम तुटली नाही, पण (काही जणांनी) राजकारणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे टीमचे तुकडे झाले. हे या देशातल्या लोकांचं दुदैर्व आहे. पार्टी बनवणारे म्हणत होते की अण्णांची इच्छा नसेल, तर मी पार्टी बनवणार नाही. पण माझी इच्छा नसतानाही त्यांनी पार्टीची स्थापना करणार आहेत. मीच पार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असंही त्यांनी सांगितलं. हे योग्य नाही. त्या पार्टीतले सगळे लोक चारित्र्यशील असतील का, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही पार्टीत किंवा धार्मिक संघटनेत जाणार नाही. निवडणुका आल्यावर पार्टीवाले माझ्या नावाचा आणि आंदोलनाच्या नावाचा दुरुपयोग करतील. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका – अण्णा हजारे

close