ऑस्ट्रेलियाने उडवला भारताचा धुव्वा

September 28, 2012 5:48 PM0 commentsViews: 4

28 सप्टेंबर

इंग्लंडविरुद्धचा 6 बॅट्समन आणि 5 बॉलर असा विजयी फॉर्म्युला घेऊन उतरलेल्या भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुध्द मात्र सपाटून मार खावा लागला. सुपर एटच्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियानं भारताचा तब्बल 9 विकेट आणि 31 बॉलर राखून धुव्वा उडवला. बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा वरचढ ठरली. कॅप्टन धोणीनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली पण हा निर्णय फारसा लाभदायक ठरला नाही. गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा आणि स्वता कॅप्टन धोणी स्वस्तात आऊट झाले. इरफान पठाण आणि सुरेश रैनानं फटकेबाजी करत भारताला किमान 140 रन्सचा टप्पा गाठून दिला. लंकन पीचवर आतापर्यंत स्पीन बॉलर्सनं केलेली कमाल भारतीय स्पीन बॉलर्सही दाखवतील अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून होते. पण त्यांची सपशेल निराशा झाली. शेन वॉट्सन आणि डेव्हिड वॉर्नर या ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीनंच भारतीय बॉलर्सची अक्षरश धुलाई केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं 133 रन्सची पार्टनरशिप करत ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून दिला.

close