एफडीआयविरोधात ममतांची दिल्लीत रॅली

October 1, 2012 5:20 PM0 commentsViews: 4

01 ऑक्टोबर

एफडीआयच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी आता आणखी आक्रमक झाल्या आहे. कोलकात्यानंतर तृणमूल काँग्रेसनं आज थेट राजधानी दिल्लीत रॅली काढली. या रॅलीत त्यांनी एफडीआय आणि डिझेल दरवाढीचा विरोध तर केलाच. शिवाय वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फेडरल फ्रंट म्हणजेच नवी आघाडी बनवण्याच्या दिशेनं प्रयत्नही सुरू केलेत. या रॅलीत एनडीएचे निमंत्रक शरद यादव सहभागी झाले होते. येत्या काही आठवड्यात पाटणा आणि लखनौमध्ये नितीश कुमार, मुलायम सिंह यादव यांच्यासोबत रॅली काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुलायम सिंह यादवांनी पाठिंबा दिला तर हिवाळी अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडू, असा इशारा ममतांनी दिलाय. एकंदरीत या रॅलीच्या निमित्तानं ममता आता मोठ्या राष्ट्रीय भूमिकेची मोर्चेबांधणी करत असल्याचं स्पष्ट झालंय.

close