सोनिया गांधींच्या परदेश दौर्‍यांवर 1,880 कोटी खर्च – मोदी

October 1, 2012 5:30 PM0 commentsViews: 3

01 ऑक्टोबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबीयांना लक्ष्य केलंय. काँग्रेसनं गेल्या तीन वर्षात सोनिया गांधींचे उपचार आणि त्यांच्या परदेश दौर्‍यांसाठी 1 हजार 8,80 कोटी रुपये खर्च केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. हरियाणातल्या हिसारमधल्या रमेश वर्मा या आरटीआय कार्यकर्त्याचा हवाला देत मोदींनी हा दावा केला. पण रमेश वर्मानंच मोदींचा दावा फेटाळून लावला. आपल्याला फक्त सोनियांच्या परदेश दौर्‍याबद्दल माहिती मिळाली होती, त्यांच्या उपचाराच्या खर्चाबद्दल नाही असं त्यानी म्हटलंय. 1 हजार 880 कोटींच्या आकड्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं रमेश वर्मानं म्हटलंय. तर मोदी खोटं बोलत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

close