अतिरेक्यांचं दफन करण्यास मुस्लीम संघटनांचा विरोध

December 1, 2008 6:42 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर, मुंबईगोविंद तुपे मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याविरोधातील कारवाईत एनएसजीच्या जवानांनी 9 अतिरेक्यांना ठार केलं. हे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते. ते मुस्लीम असले तरी त्यांना कब्रस्तानात दफन करायला मुंबईतल्या मुस्लीम संघटनांनी विरोध केलाय. अतिरेक्यांच्या दफनविधीसाठी कबरस्तान वापरुन देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलीय. याबाबत मुस्लीम काऊन्सिल मेंबरचे अध्यक्ष इम्तियाज ताहीब म्हणाले, ज्या वाईट कामांसाठी हे अतिरेकी मुंबईत आले होते, त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. या नापाक लोकांच्या मृतदेहांचं भारतातल्या कब्रस्तानात दफन करुन आम्ही ती पाक जागा घाण करू शकत नाही. अतिरेक्यांच्या दफनविधींसाठी आमची कब्रस्तान नाहीत ', असंही इम्तियाज ताहीब म्हणाले.

close