सरस्वती मुंडेना जामिनावर सुटका होताच अटक

September 27, 2012 3:07 PM0 commentsViews: 6

27 सप्टेंबर

गर्भपातप्रकरणी सुटका झालेल्या डॉ. सरस्वती मुंडे यांना पुन्हा अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 2010 मध्ये केलेल्या स्टींग ऑपरेशन प्रकरणी खटल्यात सरस्वती मुंडेला अटक करण्याचे परळी दिवाणी न्यायलयाचे आदेश आहेत. यापूर्वी सरस्वती मुंडेला का अटक झाली नाही असा सवाल करत कोर्टाने तत्कालीन पीआय गाडेकर यांच्याविरोधात नोटीसही काढली आहे. 2012 च्या केसमध्ये सोमवारी डॉ.सरस्वती मुंडेला जामीन मिळाला होता. विजया पटेकर या महिलेचा गर्भपात करते समयी मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरस्वती मुंडेंना काल बुधवारी रात्री नाशिक तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. आणि सकाळी साडे अकरा वाजता सरस्वती मुंडेंना अटक करण्यात आली. मे 2012 च्या दरम्यान याआधीच पोलिसांनी सरस्वती मुंडेला अटक करायला हवी होती. परंतु, पोलिसांनी अटक न केल्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या नावाने कोर्टाने कारणे दाखवा नोटीस काढली.

close