‘निवडून आल्यास ‘लोकपाल’तात्काळ आणणार’

October 2, 2012 9:26 AM0 commentsViews: 6

02 ऑक्टोबर

भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन उभारणारे अरविंद केजरीवाल आज खर्‍या अर्थानं राजकीय आखाड्यात उतरले आहे. केजरीवाल यांनी आज त्यांच्या पक्षाचं 'स्वराज का संकल्प' या व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलं. आपला पक्ष सत्तेत आला तर 10 दिवसात लोकपाल विधेयक मंजूर करू, महागाई कमी करू, खर्‍या अर्थानं लोकांचं राज्य आणू, पक्षाचे खासदार आणि आमदार लालदिव्याच्या गाड्या वापरणार नाही कुठलीही व्हीआयपी सुविधा वापरणार नाही अशी अनेक आश्वासनं या डॉक्युमेंटमध्ये देण्यात आली आहेत. पण पक्षाचं नाव मात्र 26 नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केजरीवाल यांच्या पक्षाचा अजेंडा काय असणार आहे, ते पाहूया..

निवडून आल्यास लोकपाल बिल तात्काळ आणणार कुठल्याही भ्रष्ट नेत्याविरुद्ध कुणीही लोकपालकडे तक्रार करु शकेल कुठलाही खासदार आणि आमदार सरकारी घर स्वीकारणार नाही पक्षाने स्वीकारलेल्या सर्व निधीची माहिती वेबसाईटवर दिली जाईल

close