अजित पवारांच्या राजीनाम्यानं काँग्रेसवर दबाव नाही -ठाकरे

October 1, 2012 10:06 AM0 commentsViews: 1

01 ऑक्टोबर

अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसला लक्ष्य केलंय. तर आता काँग्रेसनं राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे. सिंचनावर श्वेतपत्रिका ही जलसंपदा खात्यानंच काढावी असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. ते भंडार्‍यामध्ये बोलत होते. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्यानं काँग्रेसवर कोणताही दबाव आलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला. सर्व मुद्यांवर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close