पुण्यात बेकायदेशीर इमारतीवर हातोडा

October 1, 2012 8:12 AM0 commentsViews: 5

01 ऑक्टोबर

पुण्यातील तळजाई पठार भागात चार मजली बेकायदेशीर इमारत कोसळून 11 जणाचा बळी गेला आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेला शहरातील विविध भागातील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न भेडसाऊ लागला. पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे आज तळजाई पठार भागातील बेकायदेशीर इमारत पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचा विरोध केला आहे. ज्यांना पहिले नोटीस देण्यात आल्या त्यांच्या वर अगोदर कारवाई करा आणि कारवाई करताना पक्षपात करू नका असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

close