हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं

December 1, 2008 6:47 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर, नागपूर मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं नागपूर इथं होणारं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपर्यंत पुढं ढकलण्यात आलंय. या अधिवेशनात एकूण 16 विधेयकं मांडण्यात येतील अशी माहिती संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. यात प्रामुख्यानं गृहनिर्माण, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, बियाणं नियंत्रण आदी महत्त्वाची विधेयकं मांडली जातील, असंही ते म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाबाबत अजूनही संसदीय समिती अभ्यास करत असल्यानं यंदाही ते पारित होण्याची लक्षणं नाहीत. अधिवेशनाच्या कालावधीबाबतही येत्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

close