टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा गेम ओव्हर

October 2, 2012 5:31 PM0 commentsViews: 17

02 ऑक्टोबर'गड आला पण सिंह गेला' अशीच अवस्था आज भारतीय टीमची झाली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 रननं विजय मिळवला, पण या विजयाचा फायदा मात्र भारतीय टीमला झाला नाही. रनरेट राखण्यात अपयशी ठरलेल्या भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 121 रन्सच्या आत रोखण्याची गरज होती. पण भारतीय बॉलर्सना यात यश आलं नाही. भारतानं पहिली बॅटिंग करत 152 रन्स केले. सुरेश रैना आणि कॅप्टन धोणीनं फटकेबाजी करत 150 रन्सचा टप्पा पार करुन दिला. याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेनं 151 रन्स केले. ड्यु प्लेसिसनं 65 रन्सची खेळी करत भारताला सेमीफायनलपासून दूर ठेवलं.

पाकचा मार्ग मोकळा

भारताचं आव्हान संपुष्टात आल्याने पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्तानने 6 विकेट गमावत 149 रन्स केले आहे. पण हे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. पाकिस्तानच्या स्पीन बॉलिंगच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाची टीम फसली. आणि टीम 117 रन्सच करु शकली. पाकिस्ताननतर्फे सईद अजमलनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

close