कसाबच्या वकिलांनी मानधन नाकारले

October 3, 2012 3:16 PM0 commentsViews: 8

03 ऑक्टोबर

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी दहशतवादी अजमल कसाबच्या वतीने सुप्रीम कोर्टात केस लढवणारे वकील राजू रामचंद्रन यांनी मानधन घेण्यास नकार दिला आहे. कसाबची केस लढवल्यामुळे त्यांना सरकारने 14 लाखांचं मानधन दिलं होतं. पण हे मानधन त्यांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे ही रक्कम मुंबई हल्ल्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

close