अण्णा हजारेंशी कुठलाही वाद नाही -केजरीवाल

October 1, 2012 10:18 AM0 commentsViews: 3

01 ऑक्टोबर

अण्णा हजारे यांच्याशी कुठलाही वाद नाही, आमचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज अचानक अण्णा हजारेंची भेट घेतली. अरविंद उद्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. उद्या गांधी जयंतीचं औचित्य साधत केजरीवाल नव्या राजकीय पक्षाची घोषणा करतील. पक्षाची दिशा, धोरण, आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रिया याबद्दल 26 नोव्हेंबरला घोषणा होणार आहे. नवा पक्ष स्थापन करायला अण्णा हजारे यांनी विरोध केला होता. या मतभेदांमुळेच टीम अण्णा दुभंगलीय.

close