अन् विराटला अश्रू अनावर झाले

October 3, 2012 4:30 PM0 commentsViews: 14

03 ऑक्टोबर

भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपमधून आऊट झाली आणि स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये एकच शांतता पसरली. भारतीय क्रिकेटपटूंच्या चेहर्‍यावरही पराभवाचं दुख होतंच पण या पराभवाचं सर्वाधिक दुख झालं ते विराट कोहलीला. भर मैदानातच त्याला आपले अश्रू आवरणं कठिण झालं. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतातर्फे तो एकमेव फॉर्मात असलेला खेळाडू होता. या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक रन्सही त्याच्याच नावावर आहेत. 5 पैकी 2 मॅचमध्ये एकाकी झुंज देत त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही पटकावला. पण भारताला सेमीफायनल गाठून देण्यात त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्येही यंदाच्या हंगामात भारतातर्फे सर्वाधिक रन्स करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर आहे. पण टी-20 वर्ल्ड कपमधल्या पराभवाचं दुख मात्र तो लपवू शकला नाही.

close