‘सोनिया गांधींच्या आजारावर सरकारी खर्च नाही’

October 3, 2012 9:42 AM0 commentsViews: 9

03 ऑक्टोबर

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेश दौर्‍यावर 1,880 कोटी रुपये खर्च केला असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र आता याबाबत मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा यांनीचं स्पष्टीकरण दिलंय. सोनिया गांधींच्या आजारपणाचा खर्च सरकारने केला नाही तसेच सोनियांनी सरकारकडे खर्च मागितला नसल्याचं माहिती आयुक्तांनी स्पष्ट केली आहे. मोदींनी सांगितलेला आकडा हा मागिल वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातला आहे. आरटीआय कार्यकर्ते रमेश वर्मा यांनी पंतप्रधान कार्यालय, लोकसभा सचिवालय, परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे सोनिया गांधींच्या परदेश दौर्‍यावर खर्चाची माहिती मागवली होती. याचा पुराव घेऊन नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर टीका केली होती. पण रमेश वर्मा यांनी मोदींचा दावा फेटाळून लावला होता. आपल्याला फक्त सोनियांच्या परदेश दौर्‍याबद्दल माहिती मिळाली होती, त्यांच्या उपचाराच्या खर्चाबद्दल नाही. 1 हजार 880 कोटींच्या आकड्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं रमेश वर्मानं म्हटलं होतं. तर मोदी खोटं बोलत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. आज आयुक्तांच्या खुलाशामुळे मोदींचा दावा फोल ठरला आहे.

close