अशोक चव्हाणांचे विलासरावांकडे बोट

October 4, 2012 8:56 AM0 commentsViews: 8

04 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्यायमुर्ती जे. ए. पाटील आयोगापुढे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची साक्ष झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलं. आदर्श सोसायटीच्या सदस्यांच्या यादीला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. असं अशोक चव्हाण यांची आयोगापुढे सांगितलं. आयोगाचे वकील दिपक मर्चंट यांच्या प्रश्नांना अशोक चव्हाणांचे उत्तर दिले. आपल्या नातेवाईकांना आदर्श सोसायटीचे सदस्यत्वासाठी 2004 साली अर्ज केल्याचा आपणास ऑक्टोबर 2010 मध्ये कळल्याच अशोक चव्हाणांनी सांगितले.

आपल्या उत्तरात अशोक चव्हाण काय म्हणाले ते बघूया…'सभासदत्व देणं हे पूर्णपणे सोसायटीच्या अधिकारात आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी ऑफिस त्या सभासदांच्या नावांची छाननी करतं. श्रीमती भगवती शर्मा माझ्या सासू आहेत.मी त्यांचं नाव सुचवलं होतं.मदनलाल शर्मा हे माझ्या सासर्‍यांचे भाऊ आहेत. तर सीमा शर्मा माझ्या मेव्हण्याची पत्नी आहे. त्यांचं सभासदत्व 2004 मध्ये नाकारण्यात आलं होतं. याबाबत मला माहिती नव्हती. माझ्या काही नातेवाईकांनी आदर्श सोसायटीच्या सभासदत्वासाठी अर्ज केलाय याबाबत मला 2010 मध्ये माहिती मिळाली. ऑक्टोबर 2010 पर्यंत मला याबाब कुठलीही माहिती नव्हती. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2010 ला माझ्या सर्व नातेवाईकांनी सोसायटीच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. माझ्या सासूबाई भगवती शर्मा यांच्या मृत्यूनंतर, त्यांचं सभासदत्व त्यांची सून सीमा शर्मा यांना देण्यात आलं. सभासदत्व सीमा शर्मांना देतांना कुठली कायदेशीत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली याबाबत मला कुठलीही माहिती नाही.'- अशोक चव्हाण

close