ठाणेकरांवर दोन दिवसानंतर पेट्रोल टंचाईचे संकट ?

October 1, 2012 10:40 AM0 commentsViews: 6

01 ऑक्टोबर

डिझेल दरवाढीचा भार सहन करणार्‍या सर्वसामान्यांवर आणखी एका संकटाचे वादळ घोंघावत आहे. मुंबई आणि ठाणेकरांवर पेट्रोलपंप चालकांच्या आंदोलनामुळे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. तेलकंपन्यांनी कमिशन वाढवून द्यावं अशी मागणी पेट्रोलपंप मालकांनी केली आहे. तसेच दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल खरेदी बंद केली आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पेट्रोलपंप बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात दोन दिवसांनी वाहनचालकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

close