मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्वेतपत्रिकेवर चर्चा नाहीच

October 4, 2012 9:04 AM0 commentsViews: 2

04 ऑक्टोबर

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आज पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. सर्वांच लक्षं लागलेला श्वेतपत्रिकेचा मुद्दा आजच्या बैठकीत उपस्थित झालाच नाही अशी माहिती सुत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी हा मुद्दा जोरदारपणे मांडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आज फक्त जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुका आणि दुष्काळाचा प्रश्न याच विषयांवर चर्चा झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व केलं. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतून कोण प्रतिनिधित्व करणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं होतं.

close