दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट अहमदाबाद

December 1, 2008 7:01 AM0 commentsViews: 5

1 डिसेंबर, अहमदाबादमुंबईनंतर आता अतिरेक्यांचं पुढचं लक्ष्य अहमदाबाद आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना एक पत्र लिहिलंय. त्यात चेन्नईच्या दोन कंपन्यांचे एजंट अतिरेक्यांसाठी निधी जमवण्याचं काम करत असल्याचं म्हटलंय. आणि म्हणूनच पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामुळे गृप्तचर संस्थांचं धाबं दणाणलं आहे. केवळ मुंबईतच 5 हजार लोकांना मारण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. आता त्यांचं पुढचं लक्ष्य पुन्हा अहमदाबाद असण्याची संशय व्यक्त केला जातोय. त्याचं कारण म्हणजे मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसव याच्या चौकशीनंतर ताबडतोब अहमदाबादचे पोलीस आयुक्त एस. पी. माथुर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना एक पत्र लिहलंय. ' आयबीएन-7' जवळ त्या पत्राचा तपशील उपलब्ध आहे. या पत्रात लिहलंय की – ' चेन्नईतल्या दोन कंपन्यांचे एजंट अतिरेक्यांसाठी निधी जमवण्याचं काम करतायत. गोल्डक्वेस्ट आणि क्वेस्टनेस्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही त्या कंपन्यांची नावं आहेत. या कंपन्यांचे एजंट तुमच्या एरियात फंडींगचं काम करतायत. त्यांचा शोध घ्या आणि त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी करा, अशा सूचना माथुर यांनी केल्यात. त्या दरम्यान अजमल कसव या अतिरेक्याने जी माहिती सांगितली आहे, त्या माहितीचा अहमदाबादमध्ये करण्यात घडवण्यात येणार्‍या घातपाती कारवाईशी संदर्भ लागत आहे. कसव म्हणााल होता, ' पोरबंदरच्या मार्गानंच मंुबईपर्यंत पोहोचलो. पोरबंदरमध्ये मला काही सहकारी मिळाले. इतकंच नव्हे तर पाकिस्तानहून आणलेली शस्त्रं लपवण्यासाठी गुजरातचीच निवड करण्यात आली '. या पार्श्वभूमीवर माथुर यांनी लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे. त्यांच्या पत्रात पुढं म्हटलंय की, जर चेन्नईच्या कंपनीच्या एजंटांनी बॉम्ब किंवा शस्त्रांबाबत माहिती दिली तर तो परिसर तत्काळ मोकळा करा. गरज पडल्यास तिथली वीज तोडा. त्यांनी एखाद्या शॉपिंग सेंटरचं नाव घेतल्यास त्यालाही ताबडतोब मोेकळं करा, अशा कडक सूचना माथुर यांनी पत्रात केल्या आहेत. ठोस पुरावा असल्याशिवाय एखादा वरिष्ठ अधिकारी असं पत्र लिहिणार नाही. 26 जुलैला झालेल्या सिरिअल बॉम्बस्फोटामुळे हादरलेले अहमदाबादचे पोलीस अधिकारी आता नवी जोखीम पत्करायला तयार नाहीयत.

close