सिलिंडरवर सबसिडीमुळे आनंदवनावर 50 लाखांचा वाढीव बोजा

October 3, 2012 10:01 AM0 commentsViews: 5

03 ऑक्टोबर

सवलतीच्या दरात वर्षाला फक्त 6 सिलिंडर, या केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य जनतेप्रमाणचे सामाजिक संस्थांनाही बसला आहे. गेल्या 63 वर्षांपासून कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या आनंदवनपुढे तर या सरकारी निर्णयामुळे मोठा प्रश्न उभा राहला आहे. आनंदवनला वर्षाला 8,169 गॅस सिलिंडर लागतात. आणि त्यासाठी वर्षाकाठी 34 लाख 68 हजार रुपये खर्च यायचा पण नविन सरकारी नियमामुळे हा खर्च प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. सवलतीच्या 6 सिलिंडरनंतर, पुढच्या सिलेंडरसाठी नऊशे ते हजार रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे आता, हा वाढीवखर्चसाठी कुठून निधी आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहेे. आनंदवनमध्ये सध्या सतराशेहून अधिक कुष्ठरोगी आहेत. आणि वर्षाला आनंदवनचा खर्च जवळपास 12 कोटी आहे. पण या वाढीव खर्चामुळे आनंदवनचं बजेटवर मोठा बोजा पडणार आहे.आणि त्यासाठी निधी आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.आनंदवनचं नव्हेतर अनेक सामाजिक संस्थांपुढे हा प्रश्न निर्णाण झाला आहे.

close