कोथरुडमध्ये गुंडांचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

October 4, 2012 7:32 AM0 commentsViews: 1

04 ऑक्टोबर

पुण्यातल्या कोथरुड भागात किस्तिंधा नगरमध्ये मध्यरात्री 13 ते 14 गाड्यांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी राम केदारी आणि बापू शिरसाठ या सराईत गुन्हेगारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही तोडफोड दहशत माजवण्यासाठी केल्याची माहिती आता समोर येतेय. यावेळी काही घरांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत दोनजण जखमी झाले आहे. या हल्ल्यात एक टू व्हीलर जाळण्यात आली आहे तर 14 दुचाकी वाहनं तोडण्यात आली आणि चार फोर व्हिलर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

close