रिपाइंचा आज 55 वा वर्धापन दिन

October 3, 2012 10:06 AM0 commentsViews: 8

03 ऑक्टोबर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 55 वा वर्धापन दिन आज साजरा केला जातोय. यानिमित्ताने परळच्या कामगार मैदानावर कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा हजर असणार आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर हे तीनही नेते काय भाष्य करतायत यावरुनच महायुतीची पुढची दिशा स्पष्ट होईल.

close